Mahalunge : विक्रीसाठी आणलेला चार किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज – विक्रीसाठी आणलेला चार किलो गांजा अंमली (Mahalunge) पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. 18) दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास सदगुरूनगर, महाळुंगे इंगळे येथे करण्यात आली.

शंतुनुकुमार निराकर बेहेरा (वय 24, रा. सदगुरूनगर, महाळुंगे इंगळे, ता. खेड) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह लखन हाडीया राऊत (रा. पानागिडी, जि. गंजम, ओडीसा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : वाहतूक पोलिसांनी उतरवल्या 11 हजार वाहनांच्या काळ्या काचा!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदगुरूनगर येथे एकाने विक्रीसाठी गांजा बाळगला असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई करत बेहेरा याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून एक लाख दोन हजार 625 रुपये किमतीचा चार किलो 105 ग्राम गांजा जप्त करण्यात आला. बेहेरा याने हा गांजा ओडीसा येथील लखन याच्याकडून आणला असल्याचे समोर आल्याने त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.