Mahalunge Murder : गळा चिरून व दगडाने ठेचून महिलेचा खून करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – म्हाळुंगे हद्दीत एका तरुणीचा गळा (Mahalunge Murder) चिरून दगडाने ठेचून खून केलेला मृतदेह सोमवारी (दि.21) झुडपात आढळला होता. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून आरोपीला 24 तासाच्या आत अटक केले आहे. हा खून विवाहबाह्य प्रेमसंबंधातून झाल्याचे तपासात उघड झाले आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा तीनच्या तपासी पथकाने केली आहे.

राम कुंडलीक सुर्यवंशी (वय 39, रा.दापोडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. सुरुवातीला आरोपीने संबंधित तरुणीचा खून झाल्याचे समजताच धक्का बसल्याचे नाटक केले. तो मोठमोठ्याने रडू लागला मात्र पोलिसांना त्याच्यावरील संशय हटत नव्हता. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे कबुल केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मृतदेहाचे तोंड दगडाने ठेचलेले असल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे हे देखील पोलिसांसमोर एक अव्हान होते.

मात्र, पोलिसांनी यासाठी परिसरातील (Mahalunge Murder)तब्बल 90 सीसीटीव्ही तपासले. परिसरातील घरमालक, दुकानदार, भाडेकरू यांची चौकशी केली. यावेळी पोलिसांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की महिला खराबवाडी येथे रहात होता. ती शनिवारपासून बेपत्ता आहे. पोलिसांनी तरुणीच्या नातेवाईकांशी संपर्क साधून तिची ओळख पटवली.

यावेळी महिलेच्या मोबाईल क्रमांकावरून तांत्रिक माहिती काढली असता, आरोपी राम याच्याशी तिचा संपर्क असल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपीला पुण्यातील सिम्बॉयसीस परिसरातून ताब्यात घेतले. त्याला याबाबत विचारणा केली असता त्याने सुरुवातीला नाटक करत उडवा-उडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली अशता आरोपी व मयत तरुणी हे पुर्वी एका खासगी कंपनीत एकत्र काम करत होते. त्यावेळी ओळखीतून ते मित्र झाले व मैत्रिचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. मात्र, आरोपी राम हा विवाहीत होता. काही दिवसापूर्वी राम याला मयत महिला ही आणखी कोणाच्या प्रेमात असून ती आरोपीला टाळत असल्याचे त्याला जाणवले.

तसेच आरोपीच्या पत्नीला पतीच्या बाहेरील प्रेमाबाबत समजल्याने तिनेही आरोपीशी बोलणे सोडले होते. मयत महिला देखील आरोपीला बोलणे टाळत होती.याच रागातून आरोपीने मृत महिलेचा खून केल्याचे सांगितले.

Pune Navle Bridge Accident : पुण्यातील नवले पुलावर पुन्हा अपघात! दोन वाहनांचं नुकसान

आरोपीला पुढील तपासासाठी म्हाळुंगे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई गुन्हे शखा तीनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस अंमलदार यदु आढारी, सचिन मोरे, ऋषीकेश भोसुरे, सागर जैनक, अकुंश लांडे, राजकुमार हनमंते, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, राहुल सुर्यवंशी, सुधिर दांगट, महेश भालचिम,विठ्ठल सानप, समीर काळे, निखील फापाळे, शशिकांत नांगरे, रामदास मेरगळ, नागेश माळी, राजेंद्र शेटे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.