Maharashtra News : …म्हणून महाराष्ट्र आणि केरळ मधील केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार वेळेआधी पगार

एमपीसी न्यूज – केंद्र शासनाच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या ( Maharashtra News ) नोकरदारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यातील केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार वेळेआधी मिळणार आहेत. ही बातमी केवळ सेवारत कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर निवृत्ती वेतन घेणाऱ्यांसाठी देखील आहे.

Talegaon : पोलीस कर्मचारी आणि परिवारासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केरळ राज्याचे नवीन वर्ष ओणम या सणाने सुरु होते. यावर्षी ओणमचा उत्सव 20 ते 31 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सांगता दहाव्या दिवशी मोठ्या आनंदाने आणि धुमधडाक्यात होते.

त्यामुळे केरळ मधील केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन 25 ऑगस्ट रोजी त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. केरळ सरकारने ओणम सणाच्या पार्श्वभूमीवर आपल्या कर्मचाऱ्यांना चार हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे.

महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी गणेशोत्सव 19 ते 28 सप्टेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन 27 सप्टेंबर रोजी जमा होणार आहेत. याबाबत केंद्र शासनाने अधिसूचना जारी केली ( Maharashtra News ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.