Ravet : एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये स्वातंत्र्यदिन साजरा

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील (Ravet) एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त नौसेना अधिकारी कैलासनाथ सिंग यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी, उप मुख्याध्यापिका पद्मावती बंडा, पूर्व प्राथमिक व प्राथमिक समन्वयक शुभांगी कुलकर्णी, शिक्षक, कर्मचारी, पालक शिक्षक संघाचे सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते.

Maharashtra News : …म्हणून महाराष्ट्र आणि केरळ मधील केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार वेळेआधी पगार

आदित्य कदम याने इंग्रजीतून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या पुस्तकातील विचार मांडले. अथर्व भिसे याने हिंदीतून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कविता सादर केली. रिद्धी वैद्य हीने मराठीतून स्वरचित कविता सादर करीत भारतीय परंपरा, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान याविषयी भाष्य करीत G-20 या संकल्पने – अंतर्गत वसुधैव कुटुंबकम संदेश दिला.

संगीत शिक्षिका सुलोचना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली देशभक्तीपर गीत सादर केले. इ.6 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांनी देशाभिमान नृत्य आणि इ. 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांनी स्त्री, पुरुष समानतेवर नृत्य सादर केले. कला शिक्षिका क्रांती कुलकर्णी आणि योगेश देवळे यांनी सजावट केली होती.

पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले,खजिनदार शांताराम गराडे, सचिव विठ्ठल काळभोर, विश्वस्त व पीसीयू चे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी प्रजासत्ताक दिनाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा (Ravet) दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.