Pune :  महाराष्ट्राचे जे नुकसान करतात अशा लोकांना तुम्ही निवडून देता – राज ठाकरे

एमपीसी न्यूज – राज्यभरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अनेक विषयांवर अनेकदा ( Pune ) आंदोलने केली , पण पदरी काय पडलं ? महाराष्ट्राचे जे नुकसान करतात अशा लोकांना तुम्ही निवडून देता ,मला याचंच जास्त आश्चर्य वाटतं आहे, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडत राज्य सरकारवर निशाणा साधला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते हडपसर विधानसभा महीला विभाग अध्यक्षा इंद्रायणी अजय न्हावले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.त्यावेळी राज्यातील अनेक रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्या प्रश्नावर राज ठाकरे यांनी भूमिका मांडली.

Ravet : एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये स्वातंत्र्यदिन साजरा

यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, जे लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देता ते तुमच्यासमोर खड्डे आणि इतर सगळे प्रश्न निर्माण करतात. तुम्ही प्रत्येक वेळी त्याच त्याच लोकांना निवडून देता. जातीच्या नावावर, कधी धर्माच्या नावावर कधी अजून काही, त्यामुळे हे प्रश्न भिजत पडले आहेत, सुटणारच नाहीत. जोपर्यंत लोकांमधला राग मतपेटीत उतरत नाही, तोपर्यंत रस्त्यावरचे खड्डे बुजणार नाहीत,  अशा शब्दात राज्य सरकारला त्यांनी सुनावले.

तसेच ते पुढे म्हणाले की,आम्ही पुण्यात आंदोलन करत आहोत, नाशिकमध्ये करतोय. आमची रस्त्यावर आंदोलनं सुरु आहेत. मुंबई गोवा महामार्गासाठी आंदोलन करतो आहोत. यातून सरकारचे डोळे उघडतील अशी अपेक्षा आहे. पण या आंदोलना दरम्यान नागरिकांना त्रास होऊ नये हे मी कार्यकर्त्यांना सांगितलं असल्याचे त्यांनी ( Pune ) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.