Pune : पुणे कुठून कसं पसरतंय हे कळतच नाही – राज ठाकरे

एमपीसी न्यूज – तुम्हीच बघा शहर कशी वाढत आहेत.आज पुण्यात पाच (Pune) पाच पुणे आहेत.पुणे कुठून कसं पसरतंय हे कळतच नाही.कारण यावर कुणाचं लक्षच नाही. मतदार वाढवा, मतदान पदरात पाडून घ्या बाकी गेलात तेल लावत अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला  सुनावले.

Pune :  महाराष्ट्राचे जे नुकसान करतात अशा लोकांना तुम्ही निवडून देता – राज ठाकरे

राज ठाकरे यांच्या हस्ते हडपसर विधानसभा महीला विभाग अध्यक्षा इंद्रायणी अजय न्हावले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. त्यावेळी राज ठाकरे यांनी राज्यातील अनेक प्रश्नावर भाष्य देखील केले.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की,कायदा नावाची काही गोष्ट आपल्याकडे राहिली आहे असं मला वाटत नाही.

निवडणुका कधी होणार ? या प्रश्नाचं सरकारकडे एकच उत्तर,आम्ही ठरवणार तेव्हा होणार आणि तुम्ही त्यांना प्रश्न विचारत नाही. राज्य सरकारचं शहरांवर लक्ष नाही. आपल्याकडे विकासाचा आराखडा तयार असतो. पण शहर रचना केली जात नाही. तसेच एखाद्या ठिकाणाचे नियम असतात. एखाद्या ठिकाणी काय काय पाहिजे ? टाऊन प्लानिंग म्हणजे काय ते मुंबईला या मी दाखवतो अशी भूमिका यावर त्यांनी (Pune)  मांडली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.