Maharashtra : राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाचा फटका; 31 डिसेंबरपूर्वी अपात्रतेच्या प्रकरणावर निर्णय घेण्याचे निर्देश

एमपीसी न्यूज : आमदार अपात्रता दिरंगाई प्रकरणी (Maharashtra) आज सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे वेळापत्रक फेटाळले असून त्यांना न्यायालयाने फटकारले आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेच्या कारवाईत  या प्रकरणाची यादी केली होती. राहुल नार्वेकर यांनी निर्णय घेण्यासाठी 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदत मागितली होती. तथापि, न्यायालयाने ही परवानगी नाकारली असून 31 डिसेंबरपूर्वी शिवसेनेच्या प्रकरणावर आणि 31 जानेवारीपूर्वी राष्ट्रवादीच्या अपात्रतेच्या प्रकरणावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. 

शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी गटांनी एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी दाखल केलेल्या क्रॉस याचिकांवर 31 डिसेंबर किंवा त्यापूर्वी निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत.

NCP : सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीवर आम्ही समाधानी – सुनिल तटकरे

आमदार अपात्रता प्रकरणी गेल्या सहा महिन्यांत काहीच घडलेले नाही. त्यामुळे  विधानसभा अध्यक्षांकडून मुद्दाम आमदार (Maharashtra) अपात्रता सुनावणी प्रकरणी फक्त चालढकल करण्याचा प्रयत्न होत असल्याचे ठाकरे गटाकडून होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.