NCP : सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीवर आम्ही समाधानी – सुनील तटकरे

एमपीसी न्यूज : शिवसेनेसोबतच राष्ट्रवादीची याचिका एकत्र घ्यावी अशी काहींची मागणी होती. मात्र, सर्वोच्च (NCP ) न्यायालयाने दोन्ही याचिका वेगवेगळ्या आहेत. त्या वेगळ्याच पद्धतीने हाताळल्या जातील. त्यामुळे राष्ट्रवादीच्या याचिकेवर सुनावणी ही 31 जानेवारी 2024 रोजी होईल असे आदेश दिले आहेत. आमचीही तीच मागणी होती. 2 जुलै 2023 रोजी जी याचिका दाखल केली आहे, त्यामुळे एकत्रित निकाल आम्हाला मिळेल. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला अगोदरचा निकाल, राष्ट्रीय निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेले निकाल याच्या आधारीतच अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज झालेल्या सुनावणीवर आम्ही समाधानी आहोत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

शिवसेना फुटीसंदर्भात खूप मोठ्या संख्येने याचिका दाखल आहेत. पाच – सहा आमदारांवर याचिका दाखल असतील तर समजू शकतो. परंतु, दोन्ही बाजुच्या याचिका लक्षात घेतल्या तर अध्यक्षांनी जो काही निर्णय सांगितला तो त्यांचा अधिकार आहे. विधानसभा ही एक स्वायत्त संस्था आहे.

परंतु, या देशाच्या व्यवस्थेत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम असतो असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला (NCP) उत्तर देताना सांगितले.

Maratha Reservation : मराठा आरक्षण विषयक उपसमितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि तेही कायद्याच्या आधारावर टिकले पाहिजे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता ते दिले पाहिजे, अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे असेही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.