Ravet : एस.बी.पाटील पब्लिक स्कूल येथे ‘माझी माती माझा देश’ अभियान संपन्न

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड एजुकेशन ट्रस्टच्या रावेत (Ravet) येथील एस.बी.पाटील पब्लिक स्कूल येथे ‘माझी माती माझा देश’ हे अभियान राबविण्यात आले.

Pune : ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

यावेळी पाचवीतील विद्यार्थ्यांनी शिक्षिका सुजाता भोईटे यांच्या सोबत ‘पंचप्रण’ प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाची सुरुवात प्रभातफेरीने झाली. गाव ते शहरापर्यंत माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण होण्यासाठी तसेच आपल्या प्राणांची आहुती देण्याऱ्या शुरविरांचा सन्मान व्हावा याकरिता हे अभियान आयोजित केले होते.

यावेळी पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई , मुख्याध्यापक डॉ.बिंदू सैनी, मुख्य पर्यवेक्षिका शुभांगी कुलकर्णी, उप पर्यवेक्षिका अर्चना प्रभुणे, पोलीस अधिकारी व कर्मचारी, पालक पद्माकर तायडे, भूषण वाघमारे, विशाल लोधी, हनुमंत कोळपे व विद्यार्थी उपस्थित होते. प्रभातफेरीमध्ये विद्यार्थी, शिक्षकांसह पालकांनीही सहभाग घेतला. यावेळी ‘एकत्रित व्हा आनंदी राहा’, ‘मातीला नमन वीरांना वंदन’ ‘अनेकता में एकता – यही भारत की विशेषता ’ अशा घोषणा दिल्या.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, खजिनदार शांताराम गराडे, सचिव विठ्ठल काळभोर, विश्वस्त व पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.