Pimpri : महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या विहान शर्माची निवड

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या ( Pimpri ) रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा इयत्ता नववीतील विद्यार्थी विहान शर्मा याची महाराष्ट्र राज्याच्या 14 वर्षाखालील क्रिकेट संघात निवड झाली. नियमीतपणे अभ्यास आणि क्रिकेटचा सराव या मध्ये योग्य ताळमेळ राखून विहान ने यश संपादन केले.

Pune : गुंड निलेश घायवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला ; संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यावर केली टीका

तसेच ‘सहोदय पुणे सामान्य ज्ञान आणि 21 व्या शतकातील कौशल्य प्रश्नमंजुषा 2024 या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या इयत्ता नववीतील सर्वेश गुरव यांने प्रथम क्रमांक पटकावला. चिंचवड येथे अत्यंत स्पर्धात्मक आणि उत्साहात पार पडलेल्या स्पर्धेत एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत पुण्यातील 45 शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रथम फेरीत भाग घेतला होता.

 

 

एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सर्वेश गुरव आणि विहान शर्मा यांचे ( Pimpri ) अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.