Maval : जगभरातील लांब पल्ल्याच्या सायकलस्वारांसाठी आयएएसतर्फे वडगावमध्ये मोफत मुक्काम व्यवस्था

एमपीसी न्यूज –  जुन्या मुंबई पुणे महामार्गाशी संलग्न वडगाव मावळ (Maval) येथे इंडो ऍथलेटिक्स सोसायटी(आयएए) तर्फे सर्व लांब पल्ल्याच्या सायकलस्वारांसाठी मोफत मुक्काम व्यवस्थेचे उद्घाटन करण्यात आले.  देश-विदेशातील सायकल स्वार भारत भ्रमण करत असताना त्यांना अशा मोफत व्यवस्थेचा खूप फायदा होतो, तसेच प्रोत्साहन मिळते .

आय ए एस च्या कैक सायकलिस्टनी संपूर्ण भारतभर सायकल भ्रमण केले असता मोफत मुक्काम करण्यासाठी उत्तम सोयींचा अभाव प्रकर्षाने जाणवला. या अनुभवातून बोध घेत मागील आठ वर्षापासून भारत सरकारच्या अतिथी देवो भव, वसुधैव कुटुम्बकम या मोहिमेची मूल्ये जपत आय ए एस संस्थेतर्फे भारत भ्रमण करणाऱ्या देश-विदेशातील 200 हुन अधिक सायकलिस्ट्सची पुण्यात तसेच राज्यात अनेक ठिकाणी मुक्कामासाठी मोफत सेवा पुरवलेली आहे.

Pimpri : महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या विहान शर्माची निवड

वडगाव येथील ठिकाणाची जबाबदारी IASचे मुख्य सल्लागार अजय दरेकर, प्रमोद म्हाळसकर, सुनील चव्हाण यांनी या ठिकाणची संपूर्ण जबाबदारी उचलली आहे, भविष्यामध्ये संपूर्ण देशामध्ये अशाप्रकारे सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे आयएएस संस्थेतर्फे सांगण्यात आले.

आजपर्यंत आयएएस संस्थेमार्फत लांब पल्ल्याच्या पुणे ते कन्याकुमारी, पुणे ते गोवा, पुणे ते हम्पी, पुणे ते गुजरात-सोमनाथ (600-1600KM)अशा ग्रुप राईड्स यशस्वीपणे आयोजित केल्या गेल्या आहेत. 100 हुन अधिक सायकलिस्टना एकत्र घेऊन अशा प्रकारच्या लांब पल्ल्याच्या राईड्सचे आयोजन करणारी आयएएस ही एकमेव अग्रगणी संस्था आहे. भारत सरकारची संकल्पना अतिथी देवो भव ही आरोग्याच्या दृष्टिकोनातून सायकलिंग क्षेत्रात आपल्या संस्थेद्वारे राबविण्यात येत आहे

वडगाव येथील ठिकाणाचे उद्घाटन प्रसंगी गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ, गिरीराज उमरीकर, संजय साठे, युवराज पाटील, संदीप परदेशी,  गणेश जाधव, नारायण औटी, सोपान औटी, निवेश घाडगे, पंकज मुनोली, मदन शिंदे, सुनील चाकू, समीर दोशी, बळीराम शिंदे, योगेश परंडवाल, विजयकुमार सर्जिने (Maval) उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.