Talegaon Dabhade : हॅकाथॉन 2024 मध्ये एनएमआयईटीच्या विद्यार्थ्यांना यश

एमपीसी न्यूज – के. जे. सोमय्या अभियांत्रिकी महाविद्यालय मुंबई तसेच एसफोरडीएस यांच्या ( Talegaon Dabhade)संयुक्त विद्यमाने नो- कोड राष्ट्रीय स्तरावरील हॅकाथॉन 2024 ही सलग 36 तास कोडींग चॅलेंज असणारी स्पर्धा के. जे. सोमय्या अभियांत्रिकी मुंबई येथे घेण्यात आली. हॅकाथॉन 2024 मध्ये नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचे संदेश खिलारी,प्रदीप मिसाळ,ध्रुवराज निकम,गणेश घाडगे यांनी ‘अग्युमेंटल रियॅलिटी इन हेल्थ टेक’ हा प्रकल्प तब्बल 36 तास सलग कोडींग करून सादर केला. 146 संघामध्ये नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीच्या संघाने प्रथम रनरपअपचे पारितोषिक मिळवले.   

Maval : जगभरातील लांब पल्ल्याच्या सायकलस्वारांसाठी आयएएसतर्फे वडगावमध्ये मोफत मुक्काम व्यवस्था

के. जे. सोमय्या अभियांत्रिकी महाविद्यालय मुंबई तसेच एसफोरडीएस यांच्या संयुक्त विद्यमाने नो- कोड राष्ट्रीय स्तरावरील ” हॅकाथॉन 2024 ” ही सलग 36 तास  कोडींग चॅलेंज असणारी स्पर्धा के. जे. सोमय्या अभियांत्रिकी मुंबई येथे घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयातील संघ सहभागी झाला होता. तसेच विविध महाविद्यालयातील 146 संघांच्या सुमारे 600 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ” हॅकाथॉन 2024″ मध्ये नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचे संदेश खिलारी, प्रदीप मिसाळ, ध्रुवराज निकम, गणेश घाडगे यांनी ‘अग्युमेंटल रियॅलिटी इन हेल्थ टेक ‘ हा प्रकल्प तब्बल 36 तास सलग कोडींग करून सादर केला.146 संघामध्ये प्रथम रन – रपअप चे पारितोषिक प्राप्त केले.

  ” तंत्रज्ञानाच्या जगात जिथे कोडची प्रत्येक ओळ प्रगतीच्या दिशेने  पाऊल टाकत आहे. तिथे सामूहिक संघाची कामगिरी, नाविन्य आणि अथक कोडींग प्रयत्न यांच्या मार्फत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले,” असे वक्तव्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देवतारे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना केले.

संस्थेचे अध्यक्ष संजय ( बाळा ) भेगडे,उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार तसेच अभियांत्रिकीचे कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले, तसेच सर्व विभागप्रमुख,शिक्षक वर्ग यांनी मार्गदर्शन ( Talegaon Dabhade)  केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.