Pimpri : वल्लभनगर ते फुगेवाडी दरम्यान ऑईल सांडले; वाहने घसरल्याने अनेकजण जखमी

एमपीसी न्यूज – वल्लभनगर ते फुगेवाडी या दरम्यानच्या मार्गावर ( Pimpri) मोठ्या प्रमाणात ऑइल सांडले. या ऑइल वरून वाहने घसरून अनेक वाहनचालक जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि. 5) सायंकाळी घडली.

लीडिंग फायरमन विकास नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवाहतूक करणाऱ्या टेम्पो मधून सोमवारी सायंकाळी ऑईल सांडले. संबंधित टेम्पो मधून ऑईलचे बॅरल घेऊन जात असताना एखादा बॅरल लीक होऊन हे ऑईल सांडले असल्याची शक्यता आहे. संबंधित वाहनाबाबत माहिती मिळाली नाही.

Talegaon Dabhade : हॅकाथॉन 2024 मध्ये एनएमआयईटीच्या विद्यार्थ्यांना यश

वल्लभनगर बस स्थानकापासून ऑईल संडण्यास सुरुवात झाली. ते वाहन पुढे ॲटलास कॉपको कंपनी तिथून परत कासारवाडी रेल्वे स्टेशन, शंक वाडी ब्रीज मधून पुढे गेले. या मार्गावर ऑईल सांडले. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑईल सांडल्याने त्यावरून अनेक वाहने घसरली. यात अनेक वाहन चालक जखमी झाले आहेत.

ऑईलची वाहतूक करणारे वाहन रस्त्यात काही ठिकाणी थांबले होते. त्यामुळे त्या परिसरात जास्त ऑईल सांडले. काही नागरिकांनी वाहन चालकाला ऑईल सांडत असल्याचे सांगितले, असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तरीही त्या वाहन चालकाने तसेच वाहन ( Pimpri) दामटले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.