Pune : सहकारनगर, गुलटेकडी, कोंढवा, कात्रज, धनकवडी परिसरात गुरुवारी पाणी पुरवठा बंद

एमपीसी न्यूज – पर्वती जलकुंभ येथे ( Pune) विद्युत, पंपिंग आणि स्थापत्य विषयक तातडीची देखभाल दुरुस्तीची कामे येत्या गुरूवारी (8 फेब्रुवारी) पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येणार आहेत. त्यामुळे या पर्वती टाकीवर अवलंबून असलेल्या भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे.

दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (9 फेब्रुवारी) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

Talegaon Dabhade : हॅकाथॉन 2024 मध्ये एनएमआयईटीच्या विद्यार्थ्यांना यश

सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगरचा काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग 1 आणि 2, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती, महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर, डायस प्लाॅट, ढोले मळा, सॅलिसबरी पार्क परिसर, गरीधर भवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, मीठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदयक नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर याबरोबरच कोंढवा खुर्दचा काही भाग, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परिसर आणि धनकवडी या भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात ( Pune) आले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.