Pune : गुंड निलेश घायवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला ; संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यावर केली टीका

एमपीसी न्यूज – आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर गुंड आणि राजकीय नेत्यांच्या संबंधावर ( Pune) चर्चा होऊ लागली आहे. या प्रकरणास दोन दिवस झाले असताना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचा एक फोटो सोमवारी व्हायरल झाला आहे.यापूर्वी घायवळ टोळीचा प्रतिस्पर्धी असलेल्या गजा मारणेच्या भेटीला पार्थ पवार स्वतः गेले होते. त्यात पुणे शहरातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्या फोटोवरील चर्चा सुरु असताना अजित पवार यांची पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या असिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढी याने भेट घेतली.

सोमवारी या दोन फोटोंवरील चर्चा सुरु असताना मंगळवारी संजय राऊत यांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी  पुणे शहरातील गुंड निलेश घायवळ याच्यासोबतचा फोटो ट्विट केला आहे. राऊतांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, ‘महाराष्ट्रात गुंडा राज! गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य! हे महाशय कोण आहेत? त्यांचे नेमके कर्तुत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा.कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते..आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे मोदी शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीने.’

Pune : शरद मोहोळ याच्या पत्नीला सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी

निलेश घायवळ याच्या टोळीची कोथरुड परिसरात दहशत असून त्याच्यावर पोलीस रेकॉर्डवर 23 ते 24  गुन्हे दाखल आहे़. पुण्यातील गुंड गजानन मारणे आणि घायवळ टोळी या दोन्ही टोळ्यांमध्ये 2010 मध्ये वाद झाला होता. त्यावेळी निलेश घायवळ व त्याच्या टोळीने गोळीबार करीत सचिन कुडले याचा खून केला होता़. या खटल्यात फेब्रुवारी 2019 मध्ये निलेश व त्याच्या साथीदारांची निर्दोष सुटका झाली होती़.

त्यामुळे आता भेटीच्या  या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता ( Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.