Pune : शरद मोहोळ याच्या पत्नीला सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज –  शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना पुन्हा एकदा (Pune)  जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे वृत्त आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ही धमकी देण्यात आली आहे. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी मुन्ना पोळेकरच्या नावाने सोशल मीडियावर अकाउंट बनवत स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याआधीही स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

शरद मोहोळ याची यावर्षी 5 जानेवारी रोजी त्याच्या घराजवळच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. शरद मोहोळच्या लग्नाच्या वाढदिवशीच त्याच्या साथीदारांनी त्याची हत्या केली होती. मुन्ना पोळेकर याच्या नावाने स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. स्वाती मोहोळ यांना मेसेज करुन आणि आक्षेपार्ह पोस्ट करत त्यांना धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Pune : दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात शरद पवार घेणार सभा

स्वाती मोहोळ आणि फिर्यादी अरुण धृपद धुमाळ यांनी गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांच्यापासून जीवाला धोका असल्याची माहिती पोलिसांना दिली होती.

काही दिवसांपूर्वीच  पुणे पोलिसांनी संगमनेर येथून गणेश मारणे याला अटक केली होती. पोलिस आल्याचं कळताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांनी थरारक पाठलाग करत त्याला अटक केली होती. गणेश मारणे शरद मोहोळ हत्या प्रकरणातील (Pune) मुख्य आरोपी आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.