Pune : दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात शरद पवार घेणार सभा

एमपीसी न्यूज – अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात ( Pune ) शरद पवार सभा घेणार आहेत. 21 फेब्रुवारीला मंचर येथे ही सभा होणार आहे.

Pune : काँग्रेस भवनमध्ये कार्यकर्त्याला मारहाणप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवारांची सभा वळसे पाटील यांच्या मतदारसंघात होणार आहे.   राजकीय भूकंपानंतर वळसे पाटील यांनी अजित पवार यांच्याबरोबर राज्य सरकारमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवार व त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला. मतदारसंघात अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी वळसे पाटील यांच्याबरोबरच राहणे पसंत केले.

खासदार अमोल कोल्हे व  देवदत्त निकम यांनी या सभेच्या नियोजनासाठी तयारी  सुरु केली आहे.  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार यांनाही सभेसाठी निमंत्रित केले आहे. मंचर येथील डी. एस. के. प्राईड इमारतीच्या मागील चार एकर जागेत सभा घेण्याचे नियोजन असल्याचे निकम यांनी ( Pune ) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.