Maratra Reservation : मराठा आरक्षणासाठी पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात बंद आणि आंदोलने

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी (दि. 31) अनेक व्यापाऱ्यांनी (Maratra Reservation ) दुकाने बंद ठेवली. सोमवारी (दि. 30) सोशल मिडीयावर एक पोस्ट व्हायरल झाली. त्यामध्ये ‘मंगळवारी महाराष्ट्र बंद’चे आवाहन करण्यात आले होते. मात्र, तसेच अधिकृत आवाहन कोणत्याही संघटनेने केले नसल्याने त्या अफवेमुळे अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. तर हिंजवडी, वाकड, भोसरी या परिसरात स्थानिक मराठा संघटनांनी बंदचे आवाहन केले. तिथे बंद पाळण्यात आला.

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरु आहे. जालना जिल्ह्यात अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांनी मागील सात दिवसांपासून पुन्हा उपोषण सुरु केले आहे. आठवडाभराचा कालावधी उलटून देखील सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने मराठा समाज काही प्रमाणात आक्रमक झाला आहे.

Maratha Reservation : राज ठाकरेंनी मनोज जरांगेंना उपोषण थांबविण्यासाठी लिहिले पत्र; वाचा जसेच्या तसे

बीड येथे सोमवारी मराठा आंदोलकांनी लोकप्रतिनिधींचे घर आणि राजकीय पक्षाचे कार्यालय (Maratra Reservation) जाळले. ठिकठिकाणी रस्ता रोको केला. वाहनांची तोडफोड केल्याच्या देखील घटना समोर आल्या. एसटी महामंडळाने काही भागातील एसटी सेवा देखील बंद केली.

त्यातच सोमवारी सायंकाळी एक पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाली. मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असल्याचे त्या पोस्टमध्ये म्हटले होते. मराठा आरक्षणाच्या मागणीचे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरु आहे. त्यामुळे अशा प्रकारे महाराष्ट्र बंदची हाक मनोज जरांगे पाटील यांनी दिली नसल्याचे मराठा समाजाकडून सांगण्यात आले.

शहरात ठिकठिकाणी लाक्षणिक उपोषणे

जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी मराठा समाजाकडून शहरात ठिकठिकाणी लाक्षणिक उपोषणे केली जात आहेत. भोसरी येथे उपोषण झाल्यानंतर आता पिंपळे सौदागर, काळेवाडी, रहाटणी, वाकड आणि चिंचवडगाव यासह ठिकठिकाणी मंगळवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. वाल्हेकरवाडी येथे देखील आंदोलन झाले. हिंजवडी, वाकड, भोसरी आणि अन्य भागात बंदही पाळण्यात आला.

वाकडमध्ये पाळला बंद

वाकड परिसरात मराठा समाजाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली. त्यामुळे वाकड परिसरातील दुकानदारांनी बंद पाळला. मंगळवारी वाकड येथे बहुतांश दुकाने बंद होती.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.