Pune : मोहिनी जगताप यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार जिल्हा महिला सेल कार्याध्यक्षपदी निवड

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक (Pune ) कार्यकर्त्या मोहिनी जगताप यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या पुणे जिल्हा महिला सेलच्या कार्याध्यक्ष पदी निवड झाली आहे.

Maratra Reservation : मराठा आरक्षणासाठी पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात बंद आणि आंदोलने

 सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी जगताप या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांनी विविध विषयांवरील चर्चासत्रे,  माहिती (Pune ) अधिकार कायद्याचा प्रचार आणि प्रसार,  भ्रष्टाचार निर्मुलनासाठी जनजागृती,  मतदान जनजागृती,  समाजातील विविध प्रश्नांवर आंदोलने केली आहेत.

तसेच आरोग्य शिबीरे,  महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन,  समाजातील वंचित दुर्लक्षित घटकांसाठी विविध प्रकारचे सामाजिक कार्ये त्यांनी आजपर्यंत केले आहे.  तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर महिला उपाध्यक्षा या पदावरही काम केले आहे.

शिवाय, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ प्राधिकरण मध्ये संचालिका म्हणून काम केले आहे.  पिंपरी चिंचवड लघू उद्योग संघटनेच्या सल्लागार समितीमध्ये काम केले आहे.

तसेच  विशेष कार्यकारी अधिकारी (महाराष्ट्र शासन) या पदावर काम केले आहे. सद्यस्थितीत राजर्षी शाहू पतसंस्था मर्यादित निगडी प्राधिकरण येथे संचालिका म्हणून कार्यरत आहेत. या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत (Pune ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.