Māvaḷ News : मावळच्या पक्षी वैभवात अजून एक मानाचा तुरा; दुर्मिळ लालकंठी तिरचिमणीचे दर्शन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील निसर्गमित्र, पक्षी अभ्यासक व नामवंत ( Māvaḷ News ) वन्यजीव छायाचित्रकार अभय तुळशीराम केवट यांना मावळ भागात एका दुर्मिळ पक्ष्याचे दर्शन झाले आहे. मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यात हा पक्षी अभय केवट यांना दिसला, त्याची अचूक ओळख पटविण्याकरीता त्यांनी साधारण 20 दिवस त्या पक्षीचे निरीक्षण केले व त्याचे अधिवास आणि त्याचे वर्तन याचा अभ्यास करून त्या पक्ष्याची नेमकी प्रजाती ओळखून काढली. तसेच या पक्ष्याची पुणे जिल्हा व पश्चिम घाटातील भागात प्रथमच नोंद झाली असून या आधी महाराष्ट्र राज्यात फक्त 2 वेळा आढळून आला आहे.

 

 

 

लालकंठी तिरचिमणी किंवा लालकंठी चरचरी (Red Throated Pipit , शास्त्रीय नाव /Scientific Name :- Anthus Cervinus) नावाचा हा पक्षी उत्तर युरोप आणि  पेलीआर्कर्टिक व उत्तरीय अलास्का भागातील एक चिमणी कुळातील पक्षी आहे. हा एक खूप लांब स्थलांतर करणारा पक्षी असून, हा पक्षी हिवाळ्यात आफ्रिका, दक्षिण व पूर्व आशिया आणि अमेरिकेकडील पश्चिमी समुद्रकिनारी स्थलांतर करतो. भारतात हा पक्षी कधी कधी अंदमान बेटावर आढळतो.

 

 

Pune news : अवघ्या तीन दिवसात पुणे विभागातून 1 लाख 31 हजार महिलांनी केला एसटी प्रवास

 

हा पक्षी आकाराने साधारण चिमणीपेक्षा थोडा मोठा आणि परीट पक्ष्यासारखा असतो.याचे खाद्य गवतावरील छोट छोटे कीटक व आळ्या आहेत.

प्रजनन पूर्व काळात या पक्ष्याच्या चेहऱ्यावर व गळ्याभोवती लालसर तपकिरी रंग येतो म्हणून याचे नाव लालकंठी तिरचिमणी किंवा लालकंठी चरचरी (Red Throated Pipit) असे पडले आहे.

 

हे पक्षी साधारणपणे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठड्यात  परतीच्या प्रवासाला सुरूवात करतात. या पक्ष्याच्या  दर्शनामुळे पक्षी प्रेमी व पक्षी अभ्यासक यांच्यात उत्साही वातावरण आहे. या पक्षी दर्शनाने एक गोष्ट निदर्शनात येते की मावळातील पक्षी संपदा अजूनही टिकून आहे आणि अजूनही मावळ हा वन्यजीव आणि दुर्मीळ पक्ष्यांचा स्वर्गच आहे , असे मत अभय तुळशीराम केवट (Māvaḷ News) यांनी व्यक्त केले.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.