Pune news : अवघ्या तीन दिवसात पुणे विभागातून 1 लाख 31 हजार महिलांनी केला एसटी प्रवास

एमपीसी न्यूज –  प्रवासात 50 टक्क्यांच्या सवलतीनंतर महिलांची संख्या (Pune news) वाढताना दिसत आहे. अवघ्या तीन दिवसांत पुणे विभागात 1 लाख 31 हजार महिलांनी प्रवास केला असून, यातून सुमारे 35 लाख रुपयांचे उत्पन्न एसटी खात्याला प्राप्त झाले आहे. तिकिटावरची उर्वरित रक्कम राज्य सरकार देणार असल्याने एसटी आता फायद्यात येणार आहे.

 

 

Khadki News : जामिनावर बाहेर असलेल्या माथेफिरूने पत्नी व दोन वर्षाच्या मुलीला धावत्या रेल्वेतून दिले ढकलून

 

 

राज्य सरकारने अधिवेशनात महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलतीची घोषणा केली. त्याची अमंलबजावणी 17 मार्चपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी पुणे विभागात 19 हजार 186 महिलांनी प्रवास केला. 18 मार्चला 46 हजार 228 आणि 19 मार्चला 65 हजार 414 महिलांनी प्रवास केला.

 

 

नेटवर मीम चा पाऊस

या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला, त्यांच्या व पुरुष वर्गाच्या भावना यांच्यावर (Pune news)  इंटरनेटवर अक्षरशः मीम चा पाऊस पडला आहे. काही व्हारल व्हिडीओमध्ये तर बस मधील गर्दीमुळे कंडक्टर बस सीट वर चढून तिकीट काढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या या योजनेचा महिला वर्ग अगदी पुरेपुर फायदा घेताना दिसत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.