Maval : मावळसह जिल्ह्यातील 13 तालुक्यांत 241 रास्त भाव दुकानांना परवाने

अर्ज करण्याची मुदत वाढली

एमपीसी न्यूज – पुणे ग्रामीण मधील 13 तालुक्यांमध्ये 241 ठिकाणी (Maval) नवीन रास्त भाव दुकानांसाठी परवाने मंजूर करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी अर्ज करण्यास 1 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Indian Flag : ‘हर घर तिरंगा’ संकल्पात चिनी गालबोट नको ; भारत फ्लॅग फाउंडेशनचे आवाहन

पुणे ग्रामीणमध्ये मावळ, दौंड, बारामती, इंदापूर, मुळशी, शिरुर, खेड, आंबेगाव, जुन्नर, हवेली, भोर, वेल्हा, पुरंदर या तालुक्यातील एकूण 241 ठिकाणी नवीन रास्त भाव दुकान परवाना मंजूरीचा जाहीरनामा 1 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यातील काही भागातील अतिवृष्टी व  पूर परिस्थिती लक्षात घेता नवीन शिधावाटप, रास्त भाव दुकान मंजुरीसाठीच्या सहामाही कालबद्ध कार्यक्रमास शासनाकडून मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

त्यानुसार इच्छुक व पात्र संस्थांनी 1 सप्टेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर (Maval) यांनी सांगितले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.