Alandi : आळंदी ग्रामीण विभागात बिबट्याचा वावर; मध्यरात्री कुत्र्यावर हल्ला

एमपीसी न्यूज : आळंदी ग्रामीण विभागात असणाऱ्या वडगाव (Alandi) (मुख्य) रस्त्याच्या जवळ असणाऱ्या घराजवळील साखळीने बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर अंदाजे रात्री 1 च्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. त्यात ते कुत्रे मरण पावले.

बबनराव दामू कुऱ्हाडे या मालकाचे ते पाळीव कुत्रे होते. संदीप कुऱ्हाडे, युवराज वहिले, प्रसाद बोराटे यांनी वनविभागाला संबंधित घटना कळवली.

वनविभागाच्या वनरक्षक रेश्मा गायकवाड यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. तेथील कुत्रे मरण पावले, त्या ठिकाणी तसेच निवास व शेत परिसरातील पावलांच्या ठश्यांची पाहणी त्यांनी केली. ते ठसे बिबट्याचेच असल्याचे निष्पन्न झाले.

यावेळी संदीप कुऱ्हाडे, विकास कुऱ्हाडे व अग्निशमन दल कर्मचारी प्रसाद बोराटे, ज्ञानेश्वर (बापू)कुऱ्हाडे उपस्थित होते.

Maval : मावळसह जिल्ह्यातील 13 तालुक्यांत 241 रास्त भाव दुकानांना परवाने

खबरदारीचा उपाय म्हणून वन विभागातर्फे संबंधित माहितीचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. कुत्र्यावर हल्ला झाला त्या आजू बाजूच्या परिसरात मोठी लोकवस्ती असून तिथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आळंदी ग्रामीण भागासह वडगाव व केळगाव या परिसरातही बिबट्या (Alandi) आढळून येत आहे. वनक्षेत्रात बिबट्याला भक्ष्य न मिळाल्याने

ते इतरत्र फिरत आहेत, अशी विशेष टिप्पणी यावेळी प्रसिद्ध गाडा मालक अरुणशेठ घुंडरे पाटील यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.