Sangvi : उघड्या दरवाजा वाटे दीड लाखांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज – उघड्या दरवाज्यावाटे घरात प्रवेश करून अज्ञात (Sangvi) चोरट्याने एक लाख 40 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 6) सकाळी सात ते आठ वाजताच्या कालावधीत सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशाल नगर येथे घडली.

वैभव मनीष देशमुख (वय 23, रा. गणपती चौक, विशाल नगर) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alandi : आळंदी ग्रामीण विभागात बिबट्याचा वावर; मध्यरात्री कुत्र्यावर हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा (Sangvi) रविवारी सकाळी सात ते आठ वाजताच्या कालावधीत उघडा होता. त्या उघड्या दरवाज्याच्या वाटे आरोपीने घरात प्रवेश केला.

घरातून तीन मोबाईल फोन, सहा लॅपटॉप तसेच महत्त्वाची कागदपत्रे, दुचाकीची चावी असा एकूण एक लाख 40 हजारांचा ऐवज चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.