Pimple Nilakh : अग्रगण्य फायनान्स कंपनीच्या नावाने साडेचार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज –  शेअर मार्केट आणि इतर फायनान्सियल सेवा क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या मोतीलाल ओसवाल कंपनीच्या नावाने एका महिलेची साडेचार लाखांची फसवणूक करण्यात आली. शेअर खरेदी करण्याच्या बहाण्याने पैसे घेऊन नंतर संपर्क बंद करत फसवणूक केली आहे. ही घटना 12 जानेवारी ते 14 एप्रिल या कालावधीत पिंपळे निलख येथे घडली.

प्रमोद गायकवाड (रा. ठाणे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Hinjewadi: क्रिप्टो मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत 23 हजारांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद याने फिर्यादी महिलेला तो मोतीलाल ओसवाल फायनान्सियल लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगितले. महिलेशी (Pimple Nilakh) वर्षभर बोलणी करून त्यांचा विश्वास संपादन केला. कंपनीचे अनलिस्टेड सहा हजार 360 शेअर्स पाच लाख रुपयांना विकत घेण्यास सांगितले. महिलेने ते शेअर खरेदी करण्यासाठी तयारी दर्शवली असता प्रमोद याने मोरेश्वर कार्पोरेशन कंपनीच्या खात्यावर पैसे घेतले.

त्यानंतर महिलेला कोणतेही शेअर दिले नाहीत. त्यामुळे महिलेने आपण तक्रार करणार असल्याचे सांगितले असता प्रमोद याने महिलेला 50 हजार रुपये दिले. उर्वरित साडेचार लाख रुपये न देता महिलेची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.