Mahalunge : कुरळी येथे अर्ध्या तासात दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – कुरुळी येथे दत्त मंदिराजवळ पार्क केलेली दुचाकी अवघ्या अर्ध्या तासात ( Mahalunge ) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 5 ऑगस्ट रोजी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.

 

रोहित बाळासाहेब खेतरे (वय 24, रा. बर्गे वस्ती, ता. खेड. मूळ रा. बीड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Alandi : आळंदी ग्रामीण विभागात बिबट्याचा वावर; मध्यरात्री कुत्र्यावर हल्ला

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहित यांनी त्यांची 60 हजार रुपये किमतीची दुचाकी कुरुळी येथील दत्त मंदिराजवळ 5 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास पार्क केली. तिथून अज्ञात चोरट्याने दुचाकी चे हँडल लॉक तोडून फिर्यादी यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार रात्री साडेनऊ वाजता उघडकीस आला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास ( Mahalunge ) करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.