Mahalunge: गॅसचा काळाबाजार केल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज –  गॅसचा काळाबाजार केल्याप्रकरणी एका 24 वर्षीय तरुणाला अटक कऱण्यात(Mahalunge) आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 3 यांच्या पथकाने शुक्रवारी (दि.19)  महाळुंगे परिसरात केली आहे.

अलिमउद्दीन मोखलीश उद्दीन अहमद (वय 24रा.म्हाळूंगे) असे अटक (Mahalunge)आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई राहूल सुर्यवंशी यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Maval LokSabha Elections 2024 : दिलीप वेंगसरकर अकॅडमी, बिर्ला हॉस्पिटलमध्ये  मतदार जनजागृती अभियान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा कोणत्याही परवानगी शिवाय धोकादायक पद्धतीने कोणत्याही सुरक्षा व्यवस्थे शिवाय  जाणीवपुर्वक घरगुती गॅस सिलेंडर मधून  दुसऱ्या सिलेंडर मध्ये गॅस भरत होता. यावेळी पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली व 16 हजार 350 रुपयांचा गॅस जप्त केला आहे. यावरून महाळुंगे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.