Maval Corona Update : तालुक्यात आज 69 नवे कोरोनाबाधित; 91 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात सोमवारी (दि.5) 69 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 91 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 498 इतकी आहे. रुग्ण संख्या कमी होत असुन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 668 आहे.

शहरी भागात 29 तर ग्रामीण भागात 40 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 16 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषद हद्दीत 12 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 01 रुग्ण सापडले. तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 24,357 झाली आहे. तर दिवसभरात 91 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

सोमवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात कान्हे 8, राजपुरी 4, वाकसाई 3, तळेगाव दाभाडे ग्रामीण 3, आंबी, नायगाव, चांदखेड, तिकोणा व वारू प्रत्येकी 2, कोंडीवडे नामा, ब्राम्हणोली, कांब्रे नामा, कोंडीवडे आमा, जांभुळ, कल्हाट, निगडे, मोहितेवाडी, मळवंडी ठुले, कुसगाव बुद्रुक, माळवाडी व थुगाव प्रत्येकी 01असे एकूण 40 रुग्ण सापडले. तालुक्यात आतापर्यंत 23,190 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 498 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7,746लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,077 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,247 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 13,079 रुग्ण तर ग्रामीण भागात 11,287 रुग्ण आढळून आले आहेत. एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 95.21 टक्के आहे तर मृत्यू दर 2.04 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 179, लोणावळा नगरपरिषदमध्ये 93, वडगाव नगरपंचायतमध्ये 44 व ग्रामीण भागात 352 असे एकूण 668 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.