Maval : कर्मचारी बँकेला कुलूप लावायला विसरले; बँक तीन दिवस उघडीच

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील कामशेत मधील बँक ऑफ महाराष्ट्र येथे ( Maval) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांपूर्वी कर्मचारी घरी जाताना बँकेला कुलूप लावायला विसरले. त्यामुळे तब्बल तीन दिवस बँक उघडीच राहिली. कामशेत येथील एका व्यापाऱ्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. दरम्यानच्या कालावधीत बँकेत कोणता अनुचित प्रकार झाला आहे का, याची तपासणी बँक प्रशासनाकडून केली जात आहे.

Khed : रयत शिक्षण संस्थेमधील सर्वांचे गोत्र म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील – गिरीश प्रभुणे

कामशेत बाजारपेठेतील बॅंक ऑफ महाराष्ट्रचे कार्यालयाला ( Maval) कुलूपच नाही. त्यामुळे तीन दिवसांपासून बॅंक उघडीच आहे , हे येथील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विलास भटेवरा यांच्यामुळे  उघडकीस आले.

त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या बँकेमध्ये अनेक खातेदारांचे खाते असून पेन्शनर्स नोकरदार, बचतगट, शेतकरी, व्यावसायिक यांची खाती आहेत. या बँकेबद्दल अनेकांच्या तक्रारी आहेत. त्यातच बँकेचा बेजबाबदारपणा दिसून येत आहे.

शुक्रवारी संध्याकाळी चार नंतर बँक बंद झाली. शटर खाली ओढून घेतले. मात्र,बँकेचे कर्मचारी कुलूप लावायला ( Maval) विसरले. त्यामुळे शुक्रवार, चौथा शनिवार व रविवारी अकरा वाजेपर्यंत बँकेचे कुलूप न लावल्यामुळे बँक उघडीच होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.