Khed : रयत शिक्षण संस्थेमधील सर्वांचे गोत्र म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील – गिरीश प्रभुणे

एमपीसी न्यूज –  रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलेले आणि शिकविणारे (Khed) या सर्वांचे एकच गोत्र म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील, असे मत  गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.

 ते वाफगाव (ता. खेड) येथे शनिवार, (दि.23)  आयोजित  पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 136 व्या जयंतीनिमित्त  बोलत होते.

Pimpri : ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलमध्ये गणरायासाठी साकारला चंद्रयान तीनचा देखावा 

हा कार्यक्रम श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय वाफगाव, येथे आयोजित केला होता. रयत शिक्षण संस्था, साताराचे उदय शिवाजीराव पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

तसेच वैज्ञानिक डॉ. अशोक नगरकर, माजी विद्यार्थी ॲड. सतिश गोरडे, वाफगावचे सरपंच राजेंद्र टाकळकर, मुख्याध्यापिका जयश्री आसवले, उपायुक्त सुभाष इंगळे, प्रा. दिगंबर ढोकले, राजेंद्र शिंदे, धनंजय भागवत, सुरेश कराळे आदि उपस्थित होते.

त्यानंतरच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना गिरीश प्रभुणे यांनी अनेक दाखले देत भारताच्या गौरवशाली इतिहासाच्या परंपरांचा उल्लेख केला.

याप्रसंगी ॲड. सतिश गोरडे यांनी आपल्या शाळेतील आठवणी सांगत असतानाच आपण येथूनच घडलो, असे प्रांजळपणे कबूल केले. वडील नानासाहेब गोरडे सर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्यामुळे या शाळेत अनेक जण घडले असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमासाठी सरपंच राजेंद्र टाकळकर, उपसरपंच अशोक मांदळे,  स्कुल कमिटी (Khed) सदस्य बाळासाहेब इंगळे, बाळासाहेब रामाणे, सुभाष इंगळे, अजय भागवत, गोपाळ टाकळकर, सुरेश कराळे,उमेश रामाणे,नंदकुमार सुर्वे, काळुराम लंगोटे,

गणेश सुर्वे, इसाक मुलाणी, अमर बोऱ्हाडे, माऊली कराळे, रज्जाकभाई इनामदार, भरत थिटे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयातील सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

मुख्याध्यापिका जयश्री आसवले यांनी प्रास्ताविक केले विजय कराळे यांनी  (Khed) सूत्रसंचालन केले तर धनंजय भागवत यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.