Pimpri : ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलमध्ये गणरायासाठी साकारला चंद्रयान तीनचा देखावा 

एमपीसी न्यूज – ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलमध्ये मंगळवारी (दि.19)  पाच दिवसीय ( Pimpri ) गणेशाची स्थापना करण्यात आली . यावेळी केलेला चंद्रयान 3 चा देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

Pune : साडे पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेवक जोशी यांच्यासह मुलावर गुन्हा दाखल

 शाळेचे संस्थापक डॉ ललित कुमार धोका यांनी गणेशाच्या प्राणप्रतिष्ठेची पूजा केली. स्थापनेसाठी मुख्याध्यापिका विद्युत सहारे व इतर शिक्षक उपस्थित होते.

यानंतर शनिवारी (दि.23) सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शिऱ्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले व शाळेच्या आवारात गणेशाचे भक्तीभावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले.

‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर’ या नामघोषात गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला. यावेळी संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले.

गणेशोत्सवासाठी चित्रकला शिक्षक अमर ठोंबरे यांनी शाडूच्या मातीपासून पर्यावरण पूरक अशी सुंदर गणेश मूर्ती साकारली होती.

तसेच भारतासाठी अभिमानाचा क्षण म्हणजेच चंद्रयान 3 चा हुबेहूब असा देखावा उभारण्यात आला. यासाठी देखील चित्रकला शिक्षक अमर ठोंबरे सर व सहकारी यांचा सहभाग होता. अशाप्रकारे पाच दिवसीय गणेशाचे आनंदमय वातावरणात ( Pimpri ) विसर्जन झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.