Pune : साडे पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेवक जोशी यांच्यासह मुलावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज –  बॅंकेपेक्षा जादा परताव्याचे आमिष दाखवून 5 कोटी 53 लाख रुपयांची (Pune)  फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी माजी नगरसेवक उदय जोशी यांच्यासह त्यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : पुणेकरांना उद्या आयसीसी वर्ल्डकप पाहण्याची  संधी

याबाबत मंगेश जगदीश खरे (रा. सदाशिव पेठ) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून श्रीराम गॅस एजन्सीचे मालक मयुरेश उदय जोशी आणि उदय त्र्यंबक जोशी (रा. दांडेकर पूल) या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार बांधकाम ठेकेदार असून, मयुरेश यांची श्रीराम गॅस एजन्सी आहे. उदय जोशी यांनी फिर्यादी खरे यांना त्यांचा मुलगा मयुरेशच्या गॅस एजन्सीत रक्कम गुंतविल्यास बँकेपेक्षा जादा परतावा देऊ, असे आमिष दाखवले होते.

त्यावर खरे यांनी श्रीराम गॅस एजन्सीच्या बँक खात्यात 14 लाख रुपये ऑनलाइन जमा केले. खरे यांच्यासह नउजणांनी एकूण 5 कोटी 53 लाख हजार रुपये गुंतविले होते. परंतु जोशी यांनी गुंतवणूकदारांना कोणताही परतावा दिला नाही.

तसेच, रिझर्व्ह बॅंकेचा कोणताही परवाना नसताना वार्षिक 12 टक्के व्याजाच्या बनावट मुदतठेव प्रमाणपत्र देवून फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले (Pune)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.