Pune : पुणेकरांना उद्या आयसीसी वर्ल्डकप पाहण्याची  संधी

एमपीसी न्यूज –  आयसीसी वर्ल्डकप  क्रिकेट प्रेमींना पाहण्याची (Pune) संधी मिळणार आहे. उद्या (मंगळवारी) चषक पुण्यात येणार असून त्याची रॅली काढण्यात येणार आहे. ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले जाणार आहे. चषकासोबत भारतीय क्रिकेट संघाकडून खेळलेले आजी- माजी खेळाडू सहभागी असणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष रोहित पवार यांनी दिली.

Pune : भरधाव कारने पाच शेतमजुरांना चिरडले,तिघांचा मृत्यू

वर्ल्डकप बघण्याचे अनेकांचे स्वप्न असते. केवळ अतिमहत्त्वाच्या लोकांनाच बघायला मिळतो. परंतु, एमसीएच्या माध्यमातून पुण्यातील क्रिकेट प्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांना वर्ल्डकप जवळून बघता येणार आहे.

त्याचबरोबर छायाचित्र काढता येणार आहे. उद्या दुपारी बारा वाजता हॉटेल मेरियट या ठिकाणाहून चषकाची रॅली वाजत- गाजत, ढोल ताशाच्या गजरात सुरू होईल.

ती सिम्बॉयसिस, बीएमसी, फर्ग्युसन महाविद्यालयात रोडमार्गे कृषी महाविद्यालयापर्यंत रॅली निघेल. तिथे  चार ते सहा असे दोन तास चषक  असणार आहे. क्रिकेटप्रेमी चषकासोबत छायाचित्रे काढू शकणार आहेत.

या रॅलीमध्ये रणजी क्रिकेटचे खेळाडू त्याचबरोबर भारतीय क्रिकेट संघाकडून खेळलेले आजी- माजी खेळाडू सहभागी असणार आहेत. चषक पाहण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहनही त्यांनी (Pune) केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.