Khed : वसुंधऱा दिनानिमित्त – नदी प्रदुषणाबाबत आम्ही काय करूपासून ते नदीसाठी आपणच काहीतरी करू पर्यंतचा मुलांचा प्रवास  

एमपीसी न्यूज –  22 एप्रिल हा संपूर्ण जगभरात वसुंधरा दिवस म्हणून पाळला ( Khed) जातो. त्या निमित्ताने पृथ्वीचा, इथल्या निसर्गाच्या जीवनाचा सोहळा साजरा करण्याचा व त्यांच्याबाबत जनजागृती करण्याचा दिवस आहे.

बदलत्या पर्यावरणा विचार केला तर पूर्वी सुंदर दुथडी भरून वाहणाऱ्या जीवनदायिनी नद्या आता केविलवाण्या होऊन आपल्याकडे बघत आहे असे वाटते. आपण मोठ्यांनी तर निसर्गाचा पुरेपूर आनंद घेतला आणि किंबहुना वाजवीपेक्षा जास्तच त्याचा वापर केल्यामुळे त्याचे दुष्परिणार आता येणाऱ्या पिढीला भोगावे लागत आहेत.

त्यासाठी आता या पिढीलाच पुढे येऊन आपल्या निसर्गाचे संरक्षण करावे लागणार आहे आणि हि काळाची गरज ओळखून वर्क फॉर इक्वॅलिटीही सामाजिक संस्था या पिढीला निसर्गा विषयी संवेदनशील बनविण्याचा प्रयत्न करत आहे. त्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भीमा नदीचा अभ्यास करण्याची संधी आम्ही आमच्या सोबत जोडलेल्या मुलांना दिली.

त्यामुळे त्यांना एरवी “आपल्याला काय त्याचे” “नदी दूषित होत आहे तर आम्ही काय करणार?” या भूमिकेत असलेली मुले नदी वाचविण्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावे लागेल या विचारा पर्यंत पोहचली. त्यासाठी नदीचा अभ्यास, तिला वाचविण्यासाठी उपाययोजना, नदी दूषित होण्याचा अभ्यास, नदी किती सुंदर असली पाहिजे याविषयी मुलांनी स्वप्न रंगविली आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी कृती आराखडा तयार केला. त्यासाठी प्रत्यक्षात नदीची भेट, कारणाचा अभ्यास, संबंधित अधिकाऱ्या सोबत चर्चा, गावकऱ्यांचा सहभाग असे अनेक उपक्रम राबविले जात आहे. त्यातील काही मुलांच्या प्रतिक्रिया

Pimpri : बालसाहित्यातून मुलांचे भावविश्व साकार व्हायला हवे – एकनाथ आव्हाड

अनुष्का शहाजी चौधरी वय 15 वर्षे इयत्ता 9 वी – स्पोर्ट लव्हर ग्रुप: “नदीच्या पत्रात मोठ्या प्रमाणावर सांडपाणी सोडल्यामुळे, तसेच नदीमध्ये साबनायचे, डिटर्जंट चे पाणी कपडे धुणे, भांडी घासणे यामुळे जात असल्यामुळे अशा पाण्यावर जलपर्णी पोसली जाते, त्यामुळे पाण्यात ऑक्सीजन पोहचत नाही आणि मासे आणि पाण्यातील इतर जलचर जगू शकत नाहीत”

श्रध्दा नवनाथ मांजरे वय 17 वर्षे इयत्ता 11 वी प्रेरणा स्पोर्ट क्लब “थोडे सहकार्य थोडे नियोजन, नद्यांच्या सौदर्याने वाचेल ( Khed) आपले जीवन ”नदी मानवाचे जीवन आहे,  नदी शिवाय मानवाचे जीवन अपूर्ण आहे. नदीला स्वच्छ आणि सुंदर ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. सांडपाण्याची करू नीट विल्हेवाट, तरच होईल नद्यांच्या आरोग्याची पहाट.”

श्रावणी संतोष आवारी वय 17 वर्षे 11 वी – डेरींग गर्ल्स क्लब : “आमच्या खेड तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात लोकं कचरा, सांडपाणी आणि प्लास्टीक टाकत असल्यामुळे नदीच्या पात्रातून दुर्गंधी येत आहे आणि कंपन्यांचे सांडपाणी मोठ्या प्रमाणावर पात्रात सोडल्यामुळे जलचर प्राणी देखील मरत आहेत. विशिष्ट प्रकारची दुर्गंधी निर्माण झाल्यामुळे अंनेक लोकांना श्वससनाचे त्रास सुरू झाले आहेत शिवाय अनेक आजारांचा सामना खेडवासीयांना करावा लागतो आहे”.

गौरी राजेंद्र माळी वय 15 वर्षे इयत्ता 9 वी – स्पोर्ट लव्हर ग्रुप– खरपुडी बुदूर्क- “भीमा नदीचे पात्र आधी खूप मोठे होते पण कचरा, जलपर्णी यामुळे पात्र हळूहळू लहान होत आहे, नदीच्या पात्राजवळ असणाऱ्या विहीरीतून आधी पाणी शुध्द करून आम्ही पिण्यासाठी वापरत होतो, आता मात्र इथे इतकी घाण आहे की हे पाणी आम्ही पिऊ शकत नाही.  या अस्वच्छ पाण्याचा आपल्या शेतीसाठी वापर होत असल्यामुळे अन्न धान्यावर सुध्दा त्याचा वाईट परिणाम होतो आहे आणि तेच अन्न आपण खात आहोत”. 

 स्वराज भालेकर वय 16 वर्षे इयत्ता 10 वी- निमगाव आदर्श स्पोर्ट क्लब- “भीमा नदीचे पात्र दूषित झाले आहे यामुळे मला खूप वाईट वाटते आहे. मी माझ्या आदर्श स्पोर्ट् क्लब मधील सर्व सदस्यांना सोबत घेऊन या विषयावर लोकांना जागरूक करण्याचे ठरविले आहे”.

साई काशीद इयत्ता 8 वी स्पोर्ट लवर ग्रुप – खरपुडी बुद्रुक –“आपल्याला स्वच्छ आणि निर्मळ दिसणारे पाणी शुध्द आणि सुरक्षित असेलच असे नाही. त्यामुळे ते वापरण्या आधी निर्जंतुक करून घेतले पाहिजे”.

कार्तिकी मलघे वय 15 वर्षे टायगर स्पोर्ट क्लब – मलघेवाडी “कारखान्यांची संख्या दिवसेनदिवस वाढत आहे आणि सांडपाण्याचे काहीच व्यवस्थापन नाही त्यामुळे नद्या दूषित होत आहेत. हे थांबले पाहिजे”.

निसर्गाचे संवर्धन करणे हे आजच्या तरुणाई पुढील आव्हान आहे तर आनंदाने मनसोक्त नदीत डुंबणारी मुले भविष्यात पाहणे दुर्लभ आहे पण आपण आपल्या छोट्या छोट्या सवई जसे नदीत निर्माल्य न टाकता त्याचा पुनर्वापर करणे, कोणतीही गोष्ट टाकत असताना प्लास्टीक च्या पिशवीत बांधून टाकणे टाळणे अशा गोष्टी केल्यास आपण खऱ्या अर्थाने नदीला पुन्हा जीवनदायिनी बनवू शकतो अशी प्रतिक्रिया मुलांसोबत काम करणाऱ्या संस्थेच्या प्रतिनिधी अश्विनी, मोहिणी, पल्लवी आणि अनिता यांनी ( Khed)  दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.