Maval : टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रतीक्षा जाधव बिनविरोध

एमपीसी न्यूज – टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रतीक्षा अतुल जाधव यांची बिनविरोध (Maval) निवड झाली. टाकवे, फळणे व बेलज या तीन गावची असणारी एकत्रित ग्रामपंचायत अंदर मावळ मधील मुख्य बाजारपेठ असलेली टाकवे ग्रामपंचायतीची विशेष ओळख आहे.

PCMC : शहरातील एमआयडीसीचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद 

या आधीचे उपसरपंच परशुराम मालपोटे यांचा कार्यकाल संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्या रिक्त झालेल्या जागेवर प्रतिक्षा जाधव यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

प्रतीक्षा जाधव यांची उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर टाकवे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली.  उपसरपंच पदाच्या सत्कारा निमित्ताने उपस्थित एसआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, संचालक मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती शिवाजी असवले, एसआरपीचे जिल्हाध्यक्ष कोंडीबा रोकडे, कामशेतचे सरपंच बंटी गायकवाड, मा ता राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मारुती असवले, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अनिल असवले,

एसआरपीचे तालुका अध्यक्ष बबन ओव्हाळ, अंदर मावळ एस आर पी चे अध्यक्ष बाळासाहेब घाडगे, माजी सरपंच किसन ननवरे, ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सुवर्णा असवले, माजी सरपंच भूषण आसवले, सदस्य परशुराम मालपोटे, सत्तू दगडे,अविनाश आसवले, जिजाबाई गायकवाड, प्रिया मालपोटे,आशा मदगे,माजी उपसरपंच स्वामी जगताप, प्रसिद्ध गाडा मालक पै नंदू असवले, चेअरमन रवी पवार माजी सरपंच बाळासाहेब कोकाटे माजी उपसरपंच दत्तात्रय असवले  तसेच गावातील सर्व मंडळाचे आजी-माजी सदस्य उपस्थित होते.

एसआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे यांनी नवनिर्वाचित उपसरपंच प्रतिक्षा जाधव यांचा सत्कार केला व मार्गदर्शन (Maval) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.