Pune : कसबा पेठेत मेट्रोच्या कामामुळे आज पासून वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – कसबा पेठेतील मेट्रो रेल्वे स्थानकाच्या परिसरात पादचारी भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात ( Pune ) आले आहे. त्यामुळे पवळे चौकातून कमला नेहरू रुग्णालयाकडे जाणारा रस्ता दुचाकी वगळता अन्य वाहनांसाठी बंद राहील. इतर वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

कसबा पेठेतील साततोटी चौकापासून बुधवार पेठ मेट्रो स्थानकापर्यंत पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पवळे चौकातून कमला नेहरु रुग्णालयाकडे जाणाऱ्या तीन चाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांना तात्पुरती बंदी करण्यात येत आहे.

त्यामुळे दुचाकी वगळता अन्य वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

पर्यायी मार्ग –

पवळे चौकातून कमला नेहरु रुग्णालयाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पवळे चौकातून पुण्येश्वर रस्त्याने कुंभार वेस चौकमार्गे जावे. तेथून कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालय या मार्गाने कमला नेहरु रुग्णालयाकडे जावे.

पवळे चौकातून पुणे स्टेशन कडे जाणाऱ्या वाहनचालकांनी कसबा पेठ पोलिस चौकी जवळील रस्त्याने माणिक चौकमार्गे फडके हौद चौक मार्गे इच्छितस्थळी जावे.

कमला नेहरु रुग्णालयाकडून पवळे चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी कमला नेहरु रुग्णालयाजवळ चौकातून डावीकडे वळावे. महाराणा प्रताप रस्ता, देवजीबाबा चौक, गणेश रस्त्याने इच्छितस्थळी जावे.

कमला नेहरु रुग्णालय कडून उजवीकडे वळून कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयमार्गे वाहनचालकांनी कुंभार वेस चौकातून संताजी घोरपडे रस्त्याने इच्छितस्थळी ( Pune ) जावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.