Maval : इंद्रायणी नदीत उडी मारून युवकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – इंद्रायणी नदीत उडी मारून (Maval)एका युवकाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. 19) इंदोरी येथे घडली.

पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर म्हणाले, सोमवारी एकाने इंदोरी गावात स्मशानभूमी जवळ पुलावरून इंद्रायणी नदीत उडी मारल्याची माहिती तळेगाव एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाच्या मदतीने युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

मयत युवकाची ओळख पटली नाही. (Maval)त्याचे वय अंदाजे 32 वर्ष आहे. केस काळे, दाढी वाढलेली. नेसणीस काळा टी शर्ट आणि काळी पॅंट घातलेली आहे. या वर्णनाच्या व्यक्तिबाबत माहिती असल्यास तळेगाव एमआयडीसी पोलिसांशी (उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर 9823254676, अंमलदार आंबेकर 9823381605, सोरटे 9552542854) संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Shirgaon: पवना नदीच्या काठावर सुरू असलेल्या दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

कुंडमळा येथे एकाचा मृतदेह सापडला

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कुंडमळा येथे मंगळवारी (दि. 20) एका युवकाचा मृतदेह सापडला आहे. त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. त्याची देखील अद्याप ओळख पटलेली नाही.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.