Mhahalunge : अल्पवयीन मुलीचे अश्लिल फोटो नातेवाईकांना पाठवणाऱ्या विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज –  अल्पवयीन मुलीशी जवळीक साधत तिचे अश्लिल (Mhahalunge) फोटो नातेवाईकांना पाठवणाऱ्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार  2 मे ते 11 मे या कालावधीत म्हाळुंगे,मुळशी येथे घडला आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून 7351004684 या मोबाईल क्रमांक धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon : नियोजनबद्ध पद्धतीने झाली किशोर आवारे यांची हत्या?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मुलगी हि अल्पवयीन आहे हे माहित असताना देखील आरोपीने तिच्याशी फोनवर बोलून, चॅटींग करून जवळीक साधली. तसेच त्या दोघांचे एकत्रीत फोटो व अश्लिल फोटो , स्क्रीन शॉट फिर्यादीच्या मुलाला व बहिणीला पाठवून पीडित मुलीची बदनामी केली. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात पोक्सो चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस याचा पुढील तपास (Mhahalunge) करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.