Talegaon : पिस्तुलाचा धाक दाखवून दुचाकी पळविल्याबद्दल किशोर आवारे हत्येतील आरोपींवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – किशोर आवारे यांची हत्या केल्यानंतर आरोपींनी (Talegaon ) पळून जात असताना बाजारपेठ परिसरात दोन व्यक्तींना पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्या दुचाकी चोरून नेल्या. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 12) दुपारी दोन वाजताच्या सुमारास बाजार गल्ली, तळेगाव दाभाडे येथे घडली.

विनोद पंढरीनाथ चव्हाण (वय 38) यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon : नियोजनबद्ध पद्धतीने झाली किशोर आवारे यांची हत्या?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सुकट, बोंबील विक्रीचा व्यवसाय करतात. ते सुकट, बोंबील घेण्यासाठी तळेगाव दाभाडे येथे आले होते. त्यांनी मारुती मंदिर चौकातून एटीएम मधून पैसे काढले आणि सरकारी दवाखान्याच्या पाठीमागे असलेल्या दुकानात सुकट, बोंबील खरेदी करण्यासाठी निघाले. त्यावेळी अनोळखी चार जणांनी फिर्यादी यांना कोयता आणि पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14/एचआर 9545) जबरदस्तीने चोरून नेली.

तसेच आरोपींनी अनिल तुकाराम जाधव यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14/जेएस 6065) जाधव यांना पिस्टलचा धाक दाखवून जबरदस्तीने चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ही घटना घडल्यानंतर घोरावाडी रेल्वे स्टेशन जवळ दुचाकी आढळली आहे. आरोपी दुचाकी सोडून पळून गेले (Talegaon )आहेत. तळेगाव पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.