RTO : पक्क्या अनुज्ञप्तीसाठी मासिक दौरा

एमपीसी न्यूज – पक्की अनुज्ञप्ती (पक्का परवाना) मिळण्याच्यादृष्टीने जुलै २०२३ मध्ये पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.

Pimpri : आंतरराष्ट्रीय कंपनीतून बोलत असल्याचे सांगत एकाची साडे सहा लाखांची फसवणूक

पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी ३ आणि ४ जुलै रोजी खेड, १० आणि ११ जुलै रोजी मंचर, १७ आणि १८ जुलै रोजी जुन्नर, २४ आणि २५ जुलै रोजी वडगाव मावळ आणि २७ जुलै रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी ३० जून रोजी सायं. ५ वाजता कोटा उपलब्ध होणार आहे, असेही कळविण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.