Pimpri Chinchwad RTO : पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 13 वाहनांचा ई-लिलाव

एमपीसी न्यूज – मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन (Pimpri Chinchwad RTO )कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत अडकवून ठेवलेल्या 13 वाहनांचा पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जाहीर ई-लिलाव केला जाणार आहे. हा लिलाव 6 मार्च रोजी सकाळी 10 ते सायं. 6 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे.

 

लिलाव करण्यात येणारी वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालय,( Pimpri Chinchwad RTO )मोशी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड येथील कार्यालयाच्या आवारात 20 फेब्रुवारी ते 5 मार्च दरम्यान कार्यालयीन वेळेत पाहणीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये बस, एचजीव्ही, एलजीव्ही, डी व्हॅन, टुरिस्ट टॅक्सी, एक्सकॅव्हेटर इत्यादी वाहनांचा समावेश आहे. लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहणार आहे.

 

Maval : मावळ तालुक्यात मध केंद्र योजनेचा जनजागृती मेळावा

 

ई-लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलदार पुणे शहर, हवेली, जुन्नर, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर व आंबेगाव यांच्या कार्यालयातील सूचनाफलकांवर तसेच https://eauction.gov.in/eauction या संकेतस्थळावर माहितीसाठी लावण्यात आली आहे. तसेच लिलावाचे अटी व नियम 16 फेब्रुवारीपासून या संकेतस्थळावर तसेच कार्यालयाच्या सूचना फलकावर उपलब्ध असतील.

जाहीर ई-लिलावात 26 ते 29 फेब्रुवारी या कालावधीत https://eauction.gov.in/eauction या संकेतस्थळावर सहभागी होता येणार आहे. जीएसटी धारकांनाच ई-लिलावात सहभागी होता येणार आहे. ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर 26 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीम प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड येथे सकाळी 10 ते सायं. 6 वाजेपर्यंत प्रत्येक वाहनासाठी 50 हजार रुपये रकमेचा धनाकर्ष ‘डी.वाय. आरटीओ पिंपरी-चिंचवड’ या नावे सादर करावा. ही वाहने ‘जशी आहेत तशी’ या तत्वावर जाहीर ई-लिलावाद्वारे विकली जातील.

कोणतेही कारण न देता ई-लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकुब ठेवण्याचे अधिकार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी यांच्याकडे राखून ठेवण्यात आले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.