Pune : भ्याड हल्ले करून कोणीच कुणाला थांबवू शकत नाहीत; देवेंद्र फडणवीस यांचा भास्कर जाधव यांना टोला

एमपीसी न्यूज : आज गुहागर येथे भाजप नेते निलेश राणे यांच्या (Pune) गाडीवर उद्धव ठाकरे गटातील भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटले की असे भ्याड हल्ले करून कोणीच कुणाला थांबवू शकत नाहीत. ज्या प्रकारची राजकीय संस्कृती आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात होत आहे; निश्चितपणे याची निराशाही त्यातुन पाहायला मिळत आहे. जी घटना घडली आहे त्यात योग्य कारवाई करू. 

Hadapsar : हडपसरमध्ये रंगला राज्यस्तरीय सेना केसरी कुस्तीचा महासंग्राम

दिनांक 24,25 आणि 26 रोजी महाराष्ट्र सरकारकडून भव्य डिफेन्स एक्सपो आयोजित करण्यात आला आहे. डिफेन्समध्ये आत्मनिर्भर भारत ही संकल्पना आणण्यासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासोबतच तिन्ही सेनेच्या क्षमता दिसणार आहे. या  (Pune) कार्यक्रमामुळे डिफेन्स प्रोडक्शन अधिक दृढ कशी करता येईल वाढ कशी करता येईल यावर मार्गदर्शन मिळणार आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे  यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचं वृत्त आहे. शिवसेनाठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील कार्यालयासमोर निलेश राणे यांचा ताफा आला. त्यावेळी ही दगडफेक झाल्याचं सांगण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.