Pune : खवले मांजराच्या तस्करीप्रकरणी सहा जणांना वनकोठडी

एमपीसी न्यूज – जुन्नर वन विभागातील घोडेगाव वनपरिक्षेत्रातील वनपरिमंडळ घोडेगाव (Pune)नियतक्षेत्र घोडेगाव येथे मंगळवारी (दि. 13) खवले मांजर (इंडियन पँगोलीन) या शेड्युल 1 मधील वन्यप्राण्याची तस्करी केल्या प्रकरणात 7 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यापैकी 6 आरोपींना 17 फेब्रुवारीपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान रोहीदास पंढरीनाथ कुळेकर (वय 55), कांताराम सखाराम वाजे (Pune)(वय 49, दोघे रा. भोमाळे, ता. खेड), सखाराम बबन मराडे (वय 43, रा. पाभे ता. खेड), सागर पुनाजी मेमाणे (वय 31, रा. तळेराण, ता. जुन्नर), जालिंदर कान्डु कशाळे (वय 65 रा. बडेश्वर, ता. मावळ), गीता नंदकुमार जगदाळे (रा. चव्हाणवस्ती कुमठे, ता. कोरेगाव जि. सातारा), शांताराम सोमनाथ कुडेकर (वय 32, रा. करंजाळे, ता. जुन्नर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यापैकी सहा आरोपींना अटक करुन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी घोडेगाव यांच्यासमोर हजर करण्यात आले असता न्यालयालाने 17 फेब्रुवारीपर्यंत वनकोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ही कार्यवाही पुणे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रविण, जुन्नर वनविभागाचे उप वनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी तथा सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर संदेश पाटील, घोडेगाव आणि खेड वनपरिक्षेत्र अधिकारी व वनकर्मचाऱ्यांनी केली.

वन व वन्यजीव तस्करी, अतिक्रमण, अवैद्य वृक्षतोड संबंधित गैरप्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाचा टोल फ्री क्रमांकावर (1926) संर्पक साधून माहिती द्यावी, असे आवाहन सहायक वनसंरक्षक संदेश पाटील यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.