Wakad : फ्लॅट विक्रीच्या व्यवहारात ग्राहकाची साडे पन्नास लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज –  फ्लॅट विक्रीचा व्यवहार ठरवून त्या बदल्यात साडे पन्नास लाख रुपये घेत एका ग्राहकाची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 30  मार्च 2022 ते 26 जून 2023 या कालावधीत वाकड (Wakad) येथे घडला आहे.

RTO : पक्क्या अनुज्ञप्तीसाठी मासिक दौरा

याप्रकरणी अजिंक्य रवींद्र ओझा (वय 32 राहणार वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून रुपेश छोटा लाल शेठ (वय 55 राहणार कोरेगाव पार्क)  व उतीन चव्हाण (वय 40 राहणार कोरेगाव पार्क)  यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी शेट अँड पोपट एंटरप्राइजेस कंपनीद्वारे वाकड येथील टीयारा सोसायटीतील फ्लॅट क्रमांक 1201 या फ्लॅटचा फिर्यादी सोबत एक कोटी 18 लाख 8 हजार रुपयांचा व्यवहार ठरवला. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करत त्यांच्याकडून आरटीजीएस द्वारे 34 लाख 4 हजार 200 रुपये तर रोख स्वरूपात 16 लाख 50 हजार रुपये असा एकूण 50 लाख 54 हजार दोनशे रुपये घेतले.
मात्र आज तागायत फ्लॅटचा व्यवहार न करता घेतलेली रक्कम ही परत केली नाही. तसेच परस्पर हा फ्लॅट इतर दोघांना विकत फिर्यादी यांची फसवणूक केली आहे. यावरून वाकड (Wakad) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.