Chakan : 92 हजाराच्या गुटख्यासह एकाला आंबेठाण येथून अटक

एमपीसी न्यूज – म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी एकाला चाकण (Chakan) येथील आंबेठाण येथून 92 हजार रुपयांच्या गुटख्यासह अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.26) दुपारी बाराच्या सुमारास करण्यात आली.

सवाराम रताराम चौधरी (वय 42 राहणार चाकण मूळ राजस्थान) असे अटक आरोपीचे नाव असून महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई शरद खैरे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहतीनुसार, आरोपी हा त्याच्या ईरटीगा कार (एम एच 14 डीएक्स 0766) या गाडीमध्ये बेकायदेशीर रित्या 92 हजार 610 रुपयांचा गुटखा घेऊन विक्रीसाठी थांबला होता.

पोलिसांना खबर मिळतात पोलिसांनी त्याला गाडी व इतर मुद्देमालासह अटक केली आहे. आरोपी विरोधात गुन्हा दाखल असून म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Wakad : फ्लॅट विक्रीच्या व्यवहारात ग्राहकाची साडे पन्नास लाखांची फसवणूक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.