Monya Jadhav Murder : गुंड मोन्या जाधवचा खून अल्पवयीन मुलांनी केला, तिघेजण ताब्यात

एमपीसी न्यूज : पुण्यातील कोंढवा परिसरात (Monya Jadhav Murder) दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री खुनाचा थरार उघडकीस आला होता. सराईत गुन्हेगार मोन्या जाधव याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. मोन्या जाधव मध्यरात्रीच्या सुमारास कोंढवा परिसरातून जात असताना त्याची दुचाकी अडवून त्याचा खून करण्यात आला होता. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आता तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत.

तोहीद समीर शेख (वय 22) त्याच्यासह दोन अल्पवयीन आरोपींनी मोन्या जाधव याचा खून केला. तोहीद शेख याला अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

Narayangaon Women Murder : महिलेचा खून मुलाने नाही, तर नवऱ्याने केला; मुलाच्या आजाराचा घेतला फायदा

पोलिसांनी आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी सांगितले की, मोन्या जाधव (Monya Jadhav Murder) हा सराईत गुन्हेगार आहे. त्याचे आणि आरोपींचे पूर्वीपासूनच वाद होते. त्यामुळे मोन्या जाधव हा आरोपींना एकट्या दुखट्याला गाठून शिवीगाळ आणि मारहाण करायचा. त्यामुळेच आरोपींनी त्याला एकट्याला गाठले आणि कोयत्याने वार करून त्याचा खून केला.

दरम्यान, खून केल्यानंतर आरोपी इतर राज्यात पळून जाण्याच्या तयारीत होते. डेक्कन परिसरातील झेड ब्रिज खाली ते जाऊन थांबले होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने सापळा रचून आरोपींना अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.