Vijay Dhume Murder : विजय ढुमे खुन प्रकरणी पोलीस ऍक्शन मोडवर; आरोपींचा शोध सुरू

एमपीसी न्यूज : पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातून एक (Vijay Dhume Murder) खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कॉलिटी लॉजच्या पार्किंगमध्ये लाईन बॉय विजय ढुमेचा निर्घृणपणे खून करण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

विजय ढुमे हा सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा होता. आज सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास तो सिंहगड रस्त्यावरील कॉलिटी लॉज मधून बाहेर पडत होता.

यावेळी दबा धरून बसलेल्या चार ते पाच हल्लेखोरांनी त्याच्यावर काही समजण्याच्या आत हल्ला केला. बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी सळ्या आणि लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यावर वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या विजयचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान संपूर्ण घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.

विजय हा राजकीय व्यक्तींशी संबंधित होता. राजकारणातील अनेक (Vijay Dhume Murder) व्यक्तींसोबत त्याची उठबस होती. तर अनेक पोलीस अधिकाऱ्यांसोबत देखील त्याचे मैत्रीचे संबंध होते. मात्र त्याचा अशा प्रकारे खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सिंहगड पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.

Pune : पिंपरी चिंचवड मधील हॉटेल व्यवसायिकाचा पुण्यामध्ये खून

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.