Pune : धक्कादायक! चेन्नईहून पुण्याला येणाऱ्या भारत गौरव यात्रा रेल्वेमधील प्रवाशांना अन्नातून विषबाधा

एमपीसी न्यूज : भारत गौरव यात्रा रेल्वेमध्ये प्रवाशांना अन्नातून (Pune) विषबाधा झाल्याची मोठी बातमी समोर येत आहे. एकूण 40 प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. चेन्नई ते पुणे भारत गौरव यात्रा अशी ही ट्रेन होती.

सर्व प्रवाशांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते. मात्र, तातडीने आरोग्य विभागाकडून उपचार केल्याने सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास ही रेल्वेगाडी पुणे रेल्वे स्थानकावर दाखल (Pune) झाली होती. पुणे रेल्वे स्थानकातच सर्व प्रवाशांना प्राथमिक उपचार देण्यात आले.

Today’s Horoscope 29 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.