Pune : सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांनी केली कर्मचाऱ्यांची फसवणूक; पीएफ घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक (Pune) मारुती नवले यांच्यावर पुणे पोलिसात फसवणुकीसह पीएफमध्ये घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवले यांच्या कोंढव्यातील सिंहगड सिटी स्कूल मधील दीडशे पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या पगारातून 2019 ते 2022 पर्यंत पीएफ भरण्यासाठी लाखो रुपये कपात करून कपात रक्कम पीएफ खात्यांमध्ये न भरता मारुती नवले यांनी स्वतःच्या फायद्यासाठी ती रक्कम वापरली. असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

Pune : धक्कादायक! चेन्नईहून पुण्याला येणाऱ्या भारत गौरव यात्रा रेल्वेमधील प्रवाशांना अन्नातून विषबाधा

कर्मचाऱ्यांचे तब्बल 74 लाख रुपये मारुती नवले यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केली असल्याची माहिती समोर आली आहे.

कपात केलेली रक्कम मारुती नवले यांनी भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून पीएफ घोटाळा केला.

मारुती नवले यांच्यावर कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात (Pune) आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.