Talegaon Dabhade : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन

एमपीसी न्यूज – फेब्रुवारी, मार्च महिन्यात (Talegaon Dabhade) दहावी, बारावीच्या परीक्षा होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने कमी वेळेत स्मार्टपणे चांगला अभ्यास कसा करायचा, या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यामध्ये प्राध्यापक नितीन फाकटकर यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.

अध्यक्ष उद्धव चितळे,उपाध्यक्ष कमलेश कारले व सचिव श्री शैल मेन्थे यांच्या पुढाकारातून सदर कार्यक्रम पार पडला.कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. या वेळी व्यापीठावर क्लबचे सचिव श्रीशैल मेन्थे, खजिनदार प्रमोद दाभाडे,रो विलास शाह,रो मथुरे काका उपस्थित होते.

Pune : सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांनी केली कर्मचाऱ्यांची फसवणूक; पीएफ घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल

लायन्स क्लब हॉल कडोलकर कॉलनी येथे झालेल्या या कार्यक्रमाला वोकेस्शनल डायरेक्टर फाकटकर सर यांनी या शेवटच्या (Talegaon Dabhade) तीन महिन्यातील अभ्यासाचे साध्या, सोप्या भाषेत सत्र आखून दिले.सदर कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.